जाहिरातींच्या जगात विराट ने मारला मैदानाबाहेर 'षटकार' | Virat Kohli Latest Updates

2021-09-13 1

मैदानावर धावांचा रतीब घालणारा विराट कोहली हा आपल्या फिटनेसबद्दलही तितकाच जागृत आहे. याच कारणामुळे काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने शितपेयांची जाहीरात करण्यासाठी नकार दिला. कोणत्याही खेळाडूसाठी शितपेय ही चांगली नसल्याचं विराट कोहलीचं मत आहे. याच कारणासाठी काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीने पेप्सी या कंपनीची जाहीरात करण्यासाठी नकार दिला होता. विराट कोहली हा आयपीएलमध्ये आतापर्यंत रॉयल चँलेजर्स बेंगलोर या संघाकडून खेळत होता. या संघाचा मालक विजय मल्ल्या याच्या ‘किंगफीशर’ या ब्रँडची जाहीरात करत होता. “मात्र मी दारुची जाहीरात कधीच करत नसल्याचं विराटने आवर्जून नमूद केलं. मी फक्त एनर्जी ड्रिंकची जाहीरात केली असल्याचं विराट म्हणाला.” नुकतच फोर्ब्स मासिकाच्या, सर्वाधीक कमाई करणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत विराटचा समावेश करण्यात आला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews